मनुष्याला गुरू करणार नाही, अशी प्रतिज्ञा करून याज्ञवल्क्य ऋषींनी शिकलेले वेद वमनाद्वारे
अनलर्न्ड केले. यानंतर त्यांनी सूर्याला गुरू करून, त्याच्याकडून साक्षात परब्रह्माने जे वेद सूर्याकडे सुरक्षित ठेवले होते ते शिकून घेतले. यात सूर्य म्हणजे कोण, वमनाद्वारे शिकलेली गोष्ट बाहेर कशी टाकली हे मला कळले नसले, तरी गुरूचं महत्व मोठंए. खरं गुरूत्व-गुरूतत्व म्हणजे ते महान अनास्तित्व होय, ज्याच्या प्राप्तीसाठी हा अब्जावधी वर्षांचा ज्ञानयाग सुरू झालाय. सभोवतालातून मानवी अस्तित्वात, आणि त्याच्या अस्तित्वातून डीएनएद्वारे हजारोवर्ष आणि हजारो वर्षांचा ज्ञानाचा वसा आपल्यापर्यंत येतोच आहे...पुढे जातोच आहे. हीच ती खरी गुरू परंपरा. खरं ज्ञान जगाच्या शाळेत मिळतं म्हणतात. सर्वत्र असणारं सर्व काही या शाळेची शिक्षक आहे. या गुरूपरंपरेला मी वंदन करतो. जगताना, जाणीव-नेणीवेच्या पातळीवर समजलेलं, कळलेलं, माहित झालेलं, दिसेलेलं, ऐकलेलं, स्पर्शिलेलं, चव घेतलेलं, आणि मुळात अनुभवलेलं असं जाहीर करण्यासाठी हा जाहिरनामा.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment